प्र. ब. कुळकर्णी - लेख सूची

संपादकीय संवाद : ग्यानबाचा विवेकवाद

प्रिय वाचक, स.न.वि.वि.विवेकवाद ह्या नावाचे एक पुस्तकच प्रा. दि.य.देशपांडे ह्यांनी लिहिलेले आहे. प्रा. दि.य.देशपांडे आजचा सुधारक ह्या आपल्या मासिकाचे संस्थापक संपादक होते. आ.सु.त सुरुवातीपासून विवेकवाद म्हणजे काय, ती कोणती विचारसरणी, ह्याचे विवेचन करणारे शक्यतो सुबोध व सविस्तर लेख त्यांनी लिहिले. अशा वीस-बावीस लेखांचा तो संग्रह आहे. असे जरी असले तरी अधून मधून आमचे वाचक, क्वचित् …

संपादकीय संवाद ग्यानबाचा विवेकवाद

प्रिय वाचक, स.न.वि.वि. विवेकवाद ह्या नावाचे एक पुस्तकच प्रा. दि.य.देशपांडे ह्यांनी लिहिलेले आहे. प्रा. दि.य.देशपांडे आजचा सुधारक ह्या आपल्या मासिकाचे संस्थापक संपादक होते. आ.सु.त सुरुवातीपासून विवेकवाद म्हणजे काय, ती कोणती विचारसरणी, ह्याचे विवेचन करणारे शक्यतो सुबोध व सविस्तर लेख त्यांनी लिहिले. अशा वीस-बावीस लेखांचा तो संग्रह आहे. असे जरी असले तरी अधून मधून आमचे वाचक, …

आजची एक भूमिकन्या सीता

एका भारतात दोन-तीन, अनेक भारत आहेत. शहरी, शिकले सवरलेले, सुस्थित भारतीयांची जी समाजस्थिती दिसते, त्यांची जी संस्कृती पाहायला मिळते तिच्यावरून संपूर्ण समाजाची कल्पना करणे योग्य होणार नाही. ग्रामीण भागात जन्या रूढी, रीति-रिवाज टिकून आहेत. बायकांच्या बाबतीत स्त्रियाच स्त्रियांच्या वैरिणी हे सत्य पदोपदी आढळते. तहत हेचा सासुरवास, हंडाबळी, बायको टाकून देणे, एकीच्या उरावर दुसरी आणून बसविणे …

अभ्यासेनिं प्रकटावें

पत्रसंवाद वाढत आहे. केशवराव जोशींची बोधक पत्रे आणि त्यांच्या निवासाचे ‘तत्त्वबोध’ हे नाव यातून ‘बोध’ उचलून तो या अंकी पत्रचर्चेतील पत्रांना जोडला आहे. वादे वादे जायते तत्त्वबोधः, म्हणतात तो होवो!! आजचा सुधारकचे वाचक कोण हा एक अशांत प्रश्न! हे खरे की जे वाचतात ते वाचक. पण त्यांनी लिहिल्याशिवाय हे कोण ते कळत नाही. आजकाल पत्रलेखनाचा …

प्रासंगिक —रिझवानुरचे रहस्य 

ही कलकत्त्याची गोष्ट आहे. पण ती मुंबईची असू शकते. हैद्राबादची असू शकते किंवा दिल्लीची देखील असू शकली असती. ही एका प्रेमविवाहाची आणि त्याच्या दुःखान्ताची कहाणी आहे. कलकत्त्याच्या प्रियंका तोडी नावाच्या तरुणीने रिझवानुर्रहमान ह्या मुस्लिम तरुणाशी लग्न केले. सिव्हिल मॅरेज केले. आपापले धर्म कायम राखून हे लग्न करता येते. लग्नातून घटस्फोट मिळविणेही सोपे आहे. रिझवान कॉम्प्युटर …

सुधारकाचा एक मित्र हरवला

आजचा सुधारक १९९० साली निघाला तेव्हा त्याचे जे वर्गणीदार झाले ते सगळे सुधारकी बाण्याचे होते असे नाही. काहींना मित्रत्वाच्या भावनेतून आम्ही तो घ्यायला लावला. हरिभाऊ त्यांतले एक. लौकरच ते आजीव वर्गणीदार झाले. आसु त माझे लेखन वाचून ते चेष्टा करत, वाः तुमचे शुद्धलेखन छान आहे! पुढे १७ वर्षांनी ‘शब्द-प्रभा’चे संपादक ह्या नात्याने मात्र त्यांनी हातचे …

शोधः सर्वत्र सारखाच

तस्लिमा नासरीनमुळे या कादंबरिकेकडे आपले लक्ष जाते, अपेक्षाभंग मात्र होत नाही. जेमतेम सत्याऐंशी पानांचा विस्तार, तोही प्रकाशकांनी बळेबळे वाढवलेला, पण विचारांचा ऐवज लहान नाही. किंबहुना तेच या कादंबरिकेचे बलस्थान. तस्लिमा ‘लज्जा’मुळे प्रकाशझोतात आली. पण ‘शोध’ ही तिच्याही आधी सहा महिने प्रकाशित झालेली. ‘फिटुं फाट’ हे या ‘शोध’चे भाषांतर. बंगालीत ‘शोध’ चा अर्थ संस्कृत ‘प्रतिशोध’ला जवळचा. …

गड्या, तू बोलत का नाही ?

प्रिय वाचक, सुधारक कोणासाठी आहे असा प्रश्न मला मधून-मधून पडतो, कधी तो वाचकही विचारतात. स्वेच्छेने, काही एका अपेक्षेने जे वर्गणीदार झाले त्यातलेही कोणी हा अवघड प्रश्न विचारतात. काही भले वाचक, आपणच वाचक म्हणून कमी पडतो अशी समजूत घालून घेतात. पण हा प्रश्न गंभीरतेने घेण्यासारखा आहे. ग्राहकाचा कधीच दोष नसतो असे म्हणतात. त्या चालीवर वाचकांचा उगीच …

संपादकीय प्र.ब.कुळकर्णी

प्रिय वाचक, ह्या अंकात अव्वल इंग्रजीतील समाजसुधारक आणि प्रबोधनकार भाऊ महाजन यांचा त्रोटक परिचय दिला आहे. तसेच त्यांच्या ‘धूमकेतु’ या साप्ताहिकातील ‘गुजराथ्यांचे महाराज’ हा लघुलेखही पुनर्मुद्रित केला आहे. नुकतीच गुरुपौर्णिमा झाली. तिच्या अनुषंगाने आपल्या संस्कृतीतील गुरु ह्या संस्थेबद्दल काही विचार मनात येतात. सर्वप्रथम जाणवते ते हे की आपल्या संस्कृतीत गुरुमाहात्म्य म्हणा किंवा गुरुमहिमा म्हणा ह्याचे …

पुस्तक परीक्षण – कोऽहम्

कादंबऱ्या सामाजिक असतात. ऐतिहासिक-राजकीय पौराणिक अशा विषयांवरून त्यांचे आणखीही प्रकार करता येतात. ह्या कादंबऱ्या कथानकाच्या बळावर लोकप्रिय होतात. लेखकाचे निवेदनकौशल्य, कथावस्तूतील नाट्य, चित्रित झालेले जीवनदर्शन वाचकाला मनोहारी वाटते. परंतु वामन मल्हार जोश्यांची रागिणी ह्या सर्वांपेक्षा वेगळ्या कारणाने आपल्या लक्षात राहिलेली असते. तिच्यातील तत्त्वचर्चा वाचकाला विविध विचारव्यूहांमधून फिरवीत राहते. रागिणी, सुशीलेचा देव ह्या कादंबऱ्या तुम्हाला नुसती …

प्रा. दि. य. देशपाण्डे यांचे मराठीतील तत्त्वचिंतन

[प्रस्तुत निबंध महाराष्ट्र तत्त्वज्ञान परिषदेच्या दापोली अधिवेशनात (ऑक्टो.२००६) वाचण्यात आला आहे.] प्रा. दि. य. देशपांडे तत्त्वज्ञानाचे अध्यापक होते आणि आजन्म तत्त्वज्ञानाचेच निष्ठावंत अभ्यासक होते. त्यांची व्यक्तिगत अल्पशी ओळख अशीः सुमारे साठ वर्षांपूर्वी, १९४० साली नागपूर विद्यापीठातून ते एम्.ए. झाले. पुढील दोन वर्षे १९४१ ते ४३ अमळनेर येथील Indian Institute of Philosophy येथे त्यांनी रिसर्च फेलो …

सुधारक दि. य. देशपांडे

मोठा माणूस गेला की त्याच्या निधनाने आपल्याला दुःख होते. त्याच्या जाण्याने एखाद्या क्षेत्राची अतोनात हानी झाली असे आपण म्हणत असतो. तो बरेचदा एक उपचार असतो. कारण वृद्धापकाळामुळे त्याचे जगणे नुसते क्रियाशून्य अस्तित्व बनले असते. तरी त्याने केलेल्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपण तसे म्हणतो. सभ्य समाजाची ही रीत आहे. प्रा. दि.य. देशपांडे यांच्या निधनाने झालेली …

मन में है विश्वास..

डॉ. विश्वास कानडे ‘आजचा सुधारक’च्या उत्पादकांपैकी एक होते. गेल्या जानेवारीच्या 29 तारखेला ते अनंतात विलीन झाले. त्यांचे ‘देहावसान’ झाले म्हणावे की नुसते ‘निवर्तले’ असे म्हणावे असा क्षणभर मला प्रश्न पडला होता. तसे पाहिले तर ‘दिवंगत’ किंवा त्याहीपेक्षा ‘कैलासवासी’ हा शब्द त्यांच्या निर्वाणला समर्पक झाला असता. कानडे भाषाशिल्पाचे चिकित्सक उपासक होते. ते नुसते कुशल पाथरवट – …

हसरी किडनी अर्थात् ‘अठरा अक्षौहिणी’ [लेखिका : पद्मजा फाटक, अक्षर प्रकाशन मुंबई, पृष्ठे बावीस + ४३७]

‘हसरी किडनी’च्या लेखिकेचे नागपूरशी नाते आहे. जन्माने. विचाराने ‘आजचा सुधारक’शी त्यांची माहेरची बांधिलकी आहे. पुस्तकाला आ.सु.च्या संस्थापक-संपादकांचा पुरस्कार आहे. तो त्यांनी आग्रहाने मिळवला आणि पद्मभूषणासारखा मिरवला आहे. ‘अशा प्रकारचे एकमेव पुस्तक’ ही त्यांची प्रशस्ती. विजय तेंडुलकर, सरोजिनी वैद्य यांच्यासारख्या नामवंत सारस्वतांनी तिला संमतिपूर्वक मान मोलावली आहे. या पुस्तकाचे प्रकाशन १६ जून २००१ या दिवशी झाले. …

अमेरिकेत आ.सु. वाचकांशी हृदयसंवाद (२)

आ.सु.च्या वतीने सर्व चर्चकांचे आभार मानणे आणि काही आणखी खुलासे करणे ही कामे उरली होती. आप्तवचन तुम्ही मानत नाही. पण धर्मग्रंथांतून तुम्ही वेळोवेळी वचने उद्धृत करता हे कसे असा एक आक्षेप या पूर्वीच्या व्याख्यानात, ‘विवेकवाद धर्माची जागा घेऊ शकेल?’ या विषयावर बोलताना घेतलेला होता. आजच्या चर्चेतही श्रद्धेची दृढनि चयाशी गफलत करून टीका झालेली होती. त्या …

अमेरिकेत आ.सु. वाचकांशी हृदयसंवाद

आधी अमेरिकेत येणे झाले तेव्हा आजचा सुधारकचे चार वर्गणीदार होते. त्यातली एक माझी मुलगी आणि इतर तीन पद्मजा फाटकांनी मिळवून दिलेले. त्यांपैकी दिलीप फडणीस म्हणाले, चार आहेत त्यांचे चाळीस करू. त्यांना एकत्र आणू. एकत्र यावे हा विचार मनात होताच. Summit ला राजेन्द्र मराठे असतो. त्याच्याजवळ बोललो. (इथे एकेरी संबोधायला वेळ जावा लागत नाही. फारशी जवळीक …

धर्माची बुद्धिगम्यता

जानेवारीचे संपादकीय महत्त्वाच्या मुद्यांवर प्रतिक्रियांचे आवाहन करते. त्यातले काही मुद्दे धर्माच्या बुद्धिगम्यतेबद्दलचे आहेत. त्यांचे मूळ डिसेंबर २००० च्या अंकातील पाटणकरांच्या अभिप्रायात आणि त्याचेही मूळ सप्टेंबर २००० च्या अंकातील ‘डॉ. दप्तरीचा अभिनव सुखवाद’ या माझ्या लेखात आणि त्याच अंकाच्या संपादकीयात आहे. जिज्ञासू वाचकांच्या सोयीसाठी हे संदर्भ दिले आहेत. १. डॉ. दप्तरी धर्म बुद्धिगम्य आणि बुद्धिप्रधान मानतात. …

तत्त्वज्ञ मे. पुं. रेगे

(प्रा. मे. पुं. रेगे यांचे तत्त्वज्ञान ह्या ग्रंथ प्रकाशनसमयी दि. १७ डिसेंबरला, प्रा. प्र. ब. कुळकर्णी यांनी केलेले भाषण) हा गौरवग्रंथ आहे. रेग्यांच्या पंचाहत्तरीनिमित्त सिद्ध केलेला. रेगे तत्त्वज्ञ आहेत. त्यांच्या विद्यार्थिनी, नागपूर विद्यापीठाच्या तत्त्वज्ञान विभागाच्या प्रमुख, प्राध्यापक सुनीती देव यांनी तो संपादित केलेला आहे. प्रा. रेग्यांचे समग्र तत्त्वज्ञान या ग्रंथात नाही. महाराष्ट्रात आणि महाराष्ट्रा-बाहेरही रेग्यांना …

लोकांना विवेकनिष्ठ होणे शक्य आहे?

स्वतःला विवेकवादी समजण्याची मला सवय आहे; आणि विवेकवादी, माझ्या मते, दुसऱ्यांनी विवेकी व्हावे असे वाटणारा असलाच पाहिजे. पण हल्ली विवेकी विचारसरणीवर बरेच जोराचे हल्ले झाले आहेत. त्यामुळे विवेकीपणा म्हणजे काय याबद्दल कोण काय समजतो ते कळेनासे झाले आहे किंवा ते समजले तरी तो प्राप्त करणे मनुष्याला साधेल का असा प्रश्न आहे. विवेकीपणाच्या प्रश्नाला दोन बाजू …

प्रिय वाचक,

ऑक्टोबर ‘९९ मध्ये आ. सु. च्या संपादकीय नेतृत्वात खांदेपालट होऊन ती जबाबदारी आमच्याकडे आली. येत्या ऑक्टोबर २००० पासून आम्ही ती सूत्रे खाली ठेवत आहोत. गेल्या एका वर्षात आम्ही काय करू शकलो, जे काही केले त्याच्या मागे कोणते विचारसूत्र होते त्याचा हा धावता आढावा. आ.सु.तले लिखाण एकसुरी असते. तेच ते लेखक, तेच ते विषय, अनु-क्रमणिका पाहिली …

डॉ. दप्तरींचा अभिनव सुखवाद : अहो, धर्म ऐहिक सुखासाठीच

विद्वद्रत्न डॉ. केशव लक्ष्मण दप्तरी (१८८०-१९५६) हे गेल्या पिढीतले मोठे विचारवंत होते. मुख्य म्हणजे ते बुद्धिप्रामाण्यवादी होते. आमच्या अर्थाने विवेकवादी होते का? याचे उत्तर एका शब्दात देता येणार नाही. १. डॉ. दप्तरी थोर धर्मज्ञ होते, आणि जनसामान्यांसाठी धर्माची आवश्यकता मानणारे होते. मात्र धर्म काय किंवा धर्मग्रंथ काय अपौरुषेय नाहीत, पूर्णपणे बुद्धिगम्य आहेत, असा त्यांचा सिद्धान्त …

प्रिय वाचक

प्रचार वाईट, प्रसार चांगला, असे आमचे एक वाङ्मयसेवक विद्वान मित्र म्हणतात. आ. सु. प्रचार-पत्र आहे हा त्याचा अवगुण आहे असे त्यांचे मत आहे. प्रसार हळूहळू होत असतो, आपोआप होतो. प्रचार केला जातो. त्यात भल्याबुऱ्या मार्गांचा विधिनिषेध नसतो. विरोधकांची मुस्कटदाबी केली जाते; कसेही करून आपलेच घोडे पुढे दामटले जाते. मेरी मुर्गीकी एकही टांग अशी हटवादी भूमिका …

प्रिय वाचक

चाटे कोचिंग क्लासेस निमित्ताने काही प्रश्न पुढे आले आहेत. सरकारी भरघोस मदतीवर शाळा कॉलेजेस चालू असताना कोचिंग क्लासेसची गरजच काय हा त्यातला एक प्रश्न. त्यांच्यावर बंदी घालावी हा तसलाच एक भाबडा उपाय. प्रचंड खर्च करून आणलेली अद्ययावत यंत्रसामग्री, सोयीस्कर इमारती आणि उत्तम तज्ज्ञ डॉक्टर सरकारी हॉस्पिटलमध्ये असताना खाजगी डॉक्टरांची, जशी आवश्यकता वाटत असते तसेच काहीसे …

प्रिय वाचक

प्रिय वाचक आपल्या प्राचीन संस्कृतीची वैशिष्ट्ये सांगताना गुस्माहात्म्य आणि पूर्वज-पूजा यांचा उल्लेख या आधी आम्ही केला. शुद्धीचे अतोनात स्तोम हे असेच एक उल्लेखनीय वैशिष्ट्य आहे. चित्तशुद्धीशिवाय ब्रह्मज्ञान नाही. देहशुद्धीशिवाय चित्तशुद्धी नाही अन्नशुद्धीशिवाय देहशुद्धी नाही. या अन्नशुद्धीच्या समजुतीत पोषक आहाराच्या शास्त्रीय चिकित्सेपेक्षा कल्पनारम्य भागच अधिक. उदा. अन्न शिजवणाऱ्याची तन-शुद्धी, पावित्र्य फार महत्त्वाचे. त्यासाठी त्याची जात तुमच्याइतकी …

बाळ : एक अज्ञातवासी ज्ञानोपासक

लहान मुलांना टी.व्ही.वरचा WWF म्हणून कार्यक्रम आहे, तो फार आवडतो. ज्यांना कोणाला तरी ठोकून काढायची इच्छा असते पण शक्य नसते अशी ही मुले असतात बहुधा. ज्ञानाच्या क्षेत्रात पुष्कळ तथाकथित मल्ल ठोकून काढायच्या लायकीचे आहेत, किंबहुना अशांचीच संख्या जास्त आहे. त्यांना सर्वांसमोर एक्स्पोज केले पाहिजे ही बाळची एक ख्वाईश होती. अधूनमधून विद्येचे असे स्वयंमन्य दिग्गज समर्थ …

प्रिय वाचक

सुधारकात काय यावे आणि काय येऊ नये याबद्दल बरेच वाचक सल्ला देत असतात. अनेक विषयांवर साहित्य आम्हाला हवे असते, परंतु ते हाती येतेच असे नाही. तसेच काही विषयांवर आम्ही जे लिखाण देतो ते अनेकांना स्चत नाही. सर्वांना संतुष्ट राखणे आणि तेही सर्वदा, शक्य नसते. ‘आमच्या प्राचीन धर्मग्रंथांतले शेण तेवढे तुम्हाला दिसते, सोने मात्र दिसत नाही’ …

अमरावतीचा सुधारक-मित्र-मेळावा

अमरावती हे स्वर्गाधीश इंद्राच्या राजधानीचे नाव. ही आठवण राहावी म्हणून तिथल्या कोणा एका छांदिष्ट कलावंताने ‘इंद्रपुरी अमरावती’ या नावाचा चित्रपटही काही वर्षांपूर्वी काढला होता. भूलोकीची अमरावती विदर्भ राजकन्या सक्मिणी हिचे माहेर आहे. या गोष्टीची आठवण ठेवून शहराबाहेर योजनापूर्वक झालेल्या वस्तीला रुक्मिणीनगर असे नावही अमरावतीकरांनी दिलेले आहे. आता ती नवी वस्ती जुनी झाली आहे. आणि तिच्याकडे …

प्रिय वाचक

प्रिय वाचक, आजचा सुधारक गेली दहा वर्षे आपल्या मगदुराप्रमाणे पुरोगामी विचारांचा प्रसार-पुरस्कार करीत आहे. हा पुरोगामी विचार काय आहे नि काय नाही याचा थोडा ऊहापोह करू या. पुरोगामी – म्हणजे पुढे जाणारा. नुसता परिवर्तनशील नाही. पण पुढे म्हणजे कुठे? ‘पुढे’ ही सापेक्ष कल्पना आहे. विवाद्य आहे. दिशा सापेक्ष. म्हणून आम्हाला अपेक्षित दिशा कोणती आहे, कोणती …

आगरकरांच्या विद्याभूमीत आजचा सुधारक

अकोल्याला आगरकरांची दोन स्मारके, एक तिथले जिल्हापरिषद आगरकर हायस्कूल आणि दुसरे मनुताई कन्या शाळा. सुमारे सव्वाशे वर्षांपूर्वी आगरकरांनी ज्या सरकारी हायस्कुलात विद्या घेतली त्याला आता सरकारने त्यांचे नाव दिले आहे. मनुताई कन्याशाळेची कहाणी वेगळी आहे. आगरकरांनी अकोल्याला भागवतमामांच्याकडे राहून विद्या केली. त्यांपैकी अनंतराव भागवतांची मुलगी मनुताई चार वर्षे नाममात्र वैवाहिक जीवनाचे कुंकू लावून बालविधवा झालेल्या. …

प्रिय वाचक

१. ६ जानेवारीला पुण्याला झालेल्या सुधारक-मित्रमेळाव्याचा वृत्तान्त या अंकात आहे. तो सविस्तर आहे असा आमचा दावा नाही. मुख्य पाहुणे आणि अध्यक्ष यांच्या भाषणातला आणि दुस-याही वक्त्यांच्या बोलण्यातला प्रशंसेचा भाग गाळला आहे. सूचना, टीका-टिप्पणी यांना प्राधान्य दिले आहे. साधनाचे संपादक श्री नरेन्द्र दाभोलकर आणि सुधारकचे चाहते-वाचक श्री. प्रकाश व मंजिरी घाटपांडे यांच्या भरीव सहकार्यामुळे हा मेळा …

पुण्याचा सुधारक-मित्रमेळा

पुण्याला सुधारकचे आजी-माजी मिळून सुमारे २५० वर्गणीदार, नागपूर दूर एका टोकाला, पुणे मध्यवर्ती, तिथे सुधारकच्या सहानुभूतिदारांचा – हितचिंतकांचा एक मेळा होऊ देत, परस्परांच्या गाठी-भेटी होतील विचारांची देवाण घेवाण होईल अशा. आपुलकी वाढवणाच्या सूचना काही बुजुर्गाकडून येत. त्या आम्हालाही हव्याशा वाटणारयाच होत्या. डिसेंबरच्या शेवटी ख्रिसमसच्या सुट्यांमध्ये काही विदेशस्थ वाचक मायदेशी असण्याची शक्यता हा एक जादाचा मुद्दा. …

प्रिय वाचक

प्रिय वाचक, १. ‘ब्राह्मणांचे गोमांस-भक्षण’ हा लेख छापून तुम्ही काय साधले? ब्राह्मण आता बदलले आहेत. बैदिक हिंदू आता पूर्वी होते तसे हिंसक राहिले नाहीत. समाजसुधारणा म्हणजे ऊठसूठ हिंदुधर्माला आणि ब्राह्मणांना झोडपणे असे तुम्ही समजता काय? ही एक प्रतिक्रिया. २. पोपप्रणीत धर्मविस्तार ह्या लेखाचे प्रयोजन काय? उगाच धर्मा-धर्मात द्वेषबुद्धी जागृत करायची ही कुठली सुधारणा? ही दुसरी …

प्रिय वाचक

१. वैचारिक लिखाणाची दाद घेऊन प्रतिक्रिया देणे हे काम कठीण आहे. म्हणून कोणी केले की आनंद होतो. मग तो प्रतिवाद पुरेसा तर्कशुद्ध का नसेना. या दृष्टीने अमेरिकेतील दोन वाचकांचा मी आभारी आहे. विवेकवादी विचारसरणी व जीवनपद्धती – ही आमची मुलाखत कॅनडातून प्रसिद्ध होणा-या ‘एकता’या त्रैमासिकाच्या जुलैच्या अंकात आली. तिची दखल ऑक्टोबर ‘९९ च्या ‘एकता’त दोन …

विवेकवादाला हरकत – दोन प्रतिक्रिया

१. उत्तर अमेरिकेत कॅनडामधून ‘एकता’ नावाचे एक मराठी त्रैमासिक प्रसिद्ध होते. त्याच्या जुलै ‘९९ च्या अंकात आमची एक मुलाखत प्रसिद्ध झाली आहे. श्रीराम गोवंडे या न्यूजर्सीमधील आमच्या मित्राने ती घेतली होती. (आजचा सुधारकच्या ऑक्टोबरच्या अंकात नंतर ती पुनर्मुद्रित केली आहे) ‘विवेकवादी विचारसरणी व जीवनपद्धती’ या नावाने. एकताच्या ऑक्टोबर ‘९९ च्या अंकात आम्ही मांडलेल्या काही मुद्द्यांवरून …

संपादकीय

प्रिय वाचक, १४ ऑक्टोबर १९५६ रोजी दसरा होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी त्या दिवशी नागपूरला समारंभपूर्वक बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. पारंपरिक बौद्ध धर्मात प्रवेश करण्याचा असा विधी नसतो. भिक्षु होण्याचा मात्र विधी असतो. तरी डॉ. बाबासाहेबांनी विधिपूर्वक बौद्धधर्म स्वीकारला. इतकेच नव्हे तर आपल्या उपस्थित असलेल्या लक्षावधी अनुयायांना धम्माची दीक्षा दिली. डॉ. बाबासाहेबांनी भगवान वुद्धाच्या चालत आलेल्या …

संपादकीय

या महिन्यापासून एक लहानसा खांदेपालट होत आहे. श्री. दिवाकर मोहनींनी गेले दीड वर्ष आजचा सुधारकचा मार्ग पुष्कळच प्रशस्त केला आहे. त्यांना थोडी मोकळीक मिळावी ह्यासाठी संपादकीय कामापुरता हा बदल आहे. आ. सु. बद्दल अनेकांच्या अपेक्षा अनेक प्रकारांनी वाढत आहेत, हे त्याच्या प्रगतीचेच लक्षण आम्ही समजतो. उदाहरणार्थ आ. सु. ने नुसते वैचारिक लिखाण प्रसिद्ध करून न …

अमेरिकेत आजचा सुधारक – (२)

बारा सप्टेंबरच्या त्या वाचकमेळ्यात सुधारक कसा वाढवता येईल याच्या अनेक सूचना पुढे आल्या. त्यांतली एक अशी की येथून आपण भारतातले वर्गणीदार प्रायोजित (स्पॉन्सर) करावे. फडणिसांच्या या सूचनेला डॉ. नरेन् तांबे (नॉर्थ कॅरोलिना) यांनी पुस्ती जोडली की व्यक्तीपेक्षा वाचनालयांना आजचा सुधारक प्रायोजित करा. सुनील देशमुखांनी कॉलेजची ग्रंथालये घ्या म्हटले – एक वर्षभर अंक प्रायोजित करून तेथे …

एकोणविसाव्या शतकातले एक विलोभनीय अद्भुत: डॉ. आनंदीबाई जोशी

काळ: एकोणिसाव्या शतकाचा तिसरा चरण. १८६५ च्या मार्च महिन्याची ३१ तारीख. त्यादिवशी कल्याण येथे एका मुलीचा जन्म झाला. नऊ वर्षांनी, १८७४ च्या मार्च महिन्याची पुन्हा तीच ३१ तारीख. त्या मुलीचा, नऊ वर्षांच्या घोडनवरीचा विवाह झाला. वर वधूपेक्षा फक्त २० वर्षांनी मोठा. बिजवर. आणखी नऊ वर्षांनी वयाच्या १८ व्या वर्षी ही ‘मुलगी उच्च शिक्षणासाठी, तेही वैद्यकीय, …

अमेरिकेत आजचा सुधारक

काही एका कौटुंबिक कारणाने अमेरिकेला जायचा योग आला. जाताना मोहनींकडून तिथल्या वर्गणीदारांची यादी घेतली. म्हटले, विचारू कसा वाटतो आजचा सुधारक ? खरोखरी वाचता की कोणाच्या भिडेखातर १० डॉलर्स भरले, असे झाले ? यादी तीसेक जणांची होती. पण काही वाचक निश्चल होते. वर्ष उलटले, स्मरणपत्रे गेली तरी हूँ की चूं नाही. न्यू जर्सीत ४ जण, त्यातली …

मुक्यांचा आक्रोश

शिक्षणाचे लोण पसरत आहे. त्याबद्दल विस्तार झाला, पण उथळपणा आला अशी तक्रारही आहे. तिच्यात तथ्यांश असेल, पण विस्ताराचे अनेक फायदेही आहे. उदा. दलित साहित्य, ते नसते तर समाजाचे केवढाले गट केवढी मोठी दु:खे मुक्याने गिळीत होते हे कळलेच नसते. मूकनायक निघायला शतकानुशतके लोटावी लागली. भीमराव गस्ती यांचे बेरड हे आत्मकथन १९८७ साली प्रकाशित झाले तेव्हा …

बाराला दहा कमीः अण्वस्त्रांचे महाभारत

एखाद्या भाषेचे सामर्थ्य त्या भाषेत ज्ञान-विज्ञान-तत्त्वज्ञान किती लिहिले गेले आहे यावरून दिसते. तिच्यात जर सूक्ष्म वैचारिक विश्लेषण करता येत असेल, गुंतागुंतीच्या कल्पना चोखपणे मांडता येत असतील, अमूर्तातील अमूर्त भेद दाखविता येत असतील, विचारांचे बारकावे व्यक्तविता येत असतील, तात्त्विक चिकित्सा, तार्किक मीमांसा आणि सैद्धान्तिक अभिव्यक्ती सहजपणे साधता येत असतील, तर ती भाषा समृद्ध आहे असे समजावे. …

पुस्तकपरिचय

श्रद्धांजली लेखक : विजय हर्डीकर, प्रकाशक : देशमुख आणि कंपनी, मूल्य : १७५ ‘जनांचा प्रवाहो चालिला’ या पुस्तकाचे लेखक म्हणून आपल्याला परिचित असलेल्या श्री. विनय हर्डीकरांचे श्रद्धांजली हे नवे पुस्तक. यात आपले जीवन श्रीमंत करणार्याल चौदा व्यक्तींच्या कर्तृत्वाचे आलेख आहेत असे ते म्हणतात. पण पुस्तक वाचून होताच वाचकाच्या मनावर ठसते ते पंधरा व्यक्तींचे व्यक्तिमत्त्व. कारण …

श्री. मा. गो. वैद्यांचे परंपरासमर्थन

गेल्या महिन्यात इंटरनॅशनल सेंटर फॉर कल्चरल स्टडीज या संघपरिवारातील संस्थेच्या वतीने नागपूरला एक परिसंवाद झाला. विषय होता ‘परंपरा आणि आधुनिकता’. या प्रसंगी परिसंवादाचे अध्यक्ष म्हणून श्री. मा. गो. वैद्य यांनी जो समारोप केला ते भाषण याच अंकात अन्यत्र दिले आहे. श्री. मा. गो. वैद्य हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचार-प्रमुख आहेत. त्यापूर्वी बौद्धिक प्रमुख …

परंपरा, प्रगती, आधुनिकता वगैरे …

आपले पूर्वज फार थोर होते, ज्ञानी होते, असे समजणारा समाज परंपरापूजक असतो. धर्माच्या नावाखाली जे चालत आले आहे त्याला चिकटून राहावे; स्वतंत्रबुद्धी चालवू नये, ही सामान्य माणसाची मनोवृत्ती. शिवाय आणखी एका कारणाने भारतीय माणूस पारंपरिक बनतो. चाणक्य इष्ट गोष्टी धर्माच्या नावाने प्रसृत कराव्यात असा सल्ला देतो. तो म्हणतो, कन्येला चांगल्या कुळात, पुत्राला विद्येत, शत्रूला संकटात …

विज्ञानवादिनी कमला सोहोनी

ब्रह्मवादिनी स्त्रियांबद्दल पुष्कळ ऐकले आहे. मुंबईच्या या खेपेत एका विज्ञानवादिनीचा वार्तालाप ऐकायला मिळाला. ब्रह्मवादिनींनी कोणाचे काय भले केले ते ठाऊक नाही. पण या विज्ञानवादिनीने मात्र लक्षावधी बालकांना मातेचे दूध, म्हशीच्या दुधावर प्रक्रिया करून उपलब्ध करून दिले. असंख्य कुटुंबांना निर्भेळ अन्न मिळण्याची सोय हाताशी ठेवून त्यांचे ऐहिक जीवन सुरक्षित करायचा प्रयत्न केला. भारतातील पहिल्या महिला वैज्ञानिक …

आहे असा कवण तो झगडा कराया?

पु. ल. देशपांडे यांच्या कलेचे वैशिष्ट्य असे आहे ,की तिने जसा आणि जितका आनंद जीवनसंग्रामातल्या विजयी वीरांना दिला आहे तसा आणि तितकाच तो पराजितांना आणि पळपुट्यांनाही दिला आहे. जीवनात येणाऱ्या विसंगतीकडे त्यांनी विनोदबुद्धीने पाहायला आम्हाला शिकविले आहे. त्यामुळे ते सर्वांनाच आपले वाटत आले आहेत. टिळकांना जसे जनतेने आपल्या मर्जीने ‘लोकमान्य’ केले तसेच पुलनांही जनतेनेच ‘महाराष्ट्रभूषण’ …

सत्याग्रही सॉक्रेटिसचे वीरमरण

गांधींना वाटले, ‘पॅसिव्ह रेझिस्टन्स’ या शब्दात न्यून आहे. ऐकणाराला ते निर्बलांचे हत्यार वाटते. त्यात द्वेषाला जागा आहे असे वाटते. शिवाय त्याची परिणती हिंसेतही होऊ शकेल. दक्षिणआफ्रिकेत आपण जो लढा उभारला त्याला काय म्हणावे या विचारात त्यांना आधी ‘सदाग्रह’ (सत्+आग्रह) आणि मग ‘सत्याग्रह’ हा शब्द सुचला. सॉक्रेटीस त्यांना जगातला पहिला सत्याग्रही वाटला.’इंडियन ओपिनियन’ या आपल्या पत्राच्या …

आगरकर : एक आगळे चरित्र (भाग २)

आगरकर ले. य. दि. फडके, मौज प्रकाशन, १९९६. किंमत रु. १७५/ आगरकर उंच होते. अंगकाठी मूळची थोराड व काटक होती(११६)*, डोळे पाणीदार (९). राहणी-वेश पारंपरिक, शेंडी मोठी पण घेरा लहान, (११६). मात्र ते जानवे घालत नसत आणि संध्याही करत नसत (२४२) .त्यांचे किंचित पुढे आलेले दात झुपकेदार मिशांनी झाकले जात (११६). बुद्धी चपळ आणि वृत्ती …

आगरकर : एक आगळे चरित्र (भाग १)

‘टिळक, आगरकर, गोखले वगैरे मंडळींविषयी आतापर्यंत खूप लिहिले गेले आहे … मात्र हे लेखन कळत नकळत एकतर्फी, पूर्वग्रहदूषित होते … ज्या शिस्तीने व काटेकोरपणे व्हावयास हवे होते तसे ते झालेले दिसत नाही,” अशी डॉ. य. दि. फडके यांची तक्रार कधीपासून वाचनात आहे. अर्वाचीन महाराष्ट्राचे इतिहासकार आणि सामाजिक परिवर्तनाचे भाष्यकार म्हणून त्यांचा लौकिक विद्वन्मान्य आहे, इतकेच …

दिवाळीतील आनंद (भाग २)

अनिल अवचटांची भेट हे दिवाळी अंकांचे एक आकर्षण असते. यावर्षी ‘मौजेत ते ‘तेंदूपानांच्या प्रश्नावर काय म्हणतात हे वाचायची उत्सुकता होती. त्या प्रश्नाचा शोध घेण्यासाठी त्यांच्या ज्या चकरा झाल्या त्यात एकदा ते आ. सुधारकच्या कार्यालयात येऊन गेले होते. अवचट संशोधक अधिक, कार्यकर्ते अधिक की लेखक अधिक असा प्रश्न पडतो. त्यांचे लिखाण वाचल्यावर विवेकशील मानवता हे जे …

दिवाळीतला आनंद (भाग १)

माझी जॉर्ज गिसिंगशी ओळख झाली त्याला पुष्कळ वर्षे लोटली. नतर तो कुठेच भेटला नाही. इंटरच्या ‘हायरोड्स आफ इंग्लिश प्रोज मध्ये ‘माय बुक्स च्या रूपने झालेली पहिली अन् शेवटची भेट. पण काही ओळखी जन्मभर लक्षात राहतात तशी ही राहिली. एखाद्या आईने ‘माय चिल्ड्रेन या विषयावर जितक्या ममतेने बोलावे तितक्या जिव्हाळ्याने त्याने ‘माय बुक्स ची ‘कवतुकें सांगितली …

बंडखोर पंडिता (भाग ४)

आगरकरांनीही अखेर पाठिंबा काढून घेतला ही गोष्ट रमाबाईंना लागली असणार. ज्या समाजात मोठमोठ्या धुरंधर नेत्यांबरोबर त्यांची उठबस होती, ज्योतिबा फुल्यांसारख्या बहुजनसमाजातल्या सुधारक कार्यकत्र्यापासून तो केरूनाना छत्र्यांसारख्या ज्योतिर्विद पंडितापर्यंत सर्वांच्या कौतुकादराचा विषय त्या झालेल्या होत्या, त्या समाजापासून त्या तुटत जाऊन एखाद्या मठस्थ जोगिणीचे जिणे त्यांच्या वाट्याला आले. तेही त्यांनी शांतपणे पत्करले. यानंतर १८९६ सालची गोष्ट. आता …

खरं, पुनर्जन्म आहे?

आपण नसावं असं कोणालाच वाटत नाही. पण वाटून काय उपयोग? जन्माला आला तो जाणार हे ध्रुवसत्य आहे. तसे मृताला पुन्हा जन्म आहे का? तेही ध्रुवसत्य आहे काय? । सश्रद्ध भावनावादी म्हणतो, ‘हो, आहे. कारण पुनर्जन्म पूर्वजन्म मानला नाही तर कशाची संगती लागत नाही. जीवनाला आधार मिळत नाही. ‘मना त्वांचि रे पूर्वसंचीत केले, तयासारिखें भोगणें प्राप्त …

बंडखोर पंडिता (भाग ३)

रमाबाईंनी हिंदू धर्म सोडला, पण हिंदुस्थानची नाळ तोडली नाही, बाईंनी हिंदुसंस्कृतीचा त्याग केला नाही याची विपुल उदाहरणे त्यांच्या चरित्रात आहेत. ‘तुमचे आईवडील सद्धर्माने (ख्रिस्ती धर्माने) देऊ केलेल्या तारणाला वंचित झाले’, असे कुणीसे म्हणाले. त्यावर ताड्कन त्या उत्तरल्या : ‘माझे आई-वडील इतके परमेश्वरभक्त, कनवाळू व सच्चरित्र होते की, त्यांच्या बाबतीत असा संशय व्यक्त केला तरी मला …

बंडखोर पंडिता (भाग २)

एखाद्या महाकाव्याचा विषय व्हावा असे रमाबाईंचे जीवनचरित्र आहे. कलकत्याहून रमाबाई पुण्याला आल्या खर्या , पण मध्यन्तरी अशा काही घटना घडल्या की कदाचित् त्या कधीच पुण्याला आल्या नसत्या. कारण त्यांनी लग्न करून आसामात सिल्चर येथे संसार थाटला होता. हे लग्नही जगावेगळे होते. त्यांचा भाऊ श्रीनिवास याचे एक बंगाली मित्र बिपिनबिहारी दास मेधावी यांनी त्यांना मागणी घातली …

बंडखोर पंडिता (भाग १)

पंडिता रमाबाईंच्या कार्याची ओळख आजचा सुधारकच्या वाचकांना करून देण्याचा विचार तसा लांबणीवरच पडत गेला. मध्यंतरीच्या एका घटनेने ते काम आणखी रेंगाळले.आजचा सुधारकच्या सल्लागार मंडळावरील एका विदुषीने धर्मांतर केले. ही गोष्ट सुधारकाला खटकली. समाजसुधारणेसाठी धर्माचे माध्यम आवश्यक समजणे ही गोष्ट त्याच्या धोरणात बसत नाही तर मग धर्मांतर करून ख्रिस्ती झालेल्या रमाबाई सुधारक कशा? आणि आंबेडकर, गांधी …

पुस्तकपरिचय -भारतीय मुसलमान : शोध आणि बोध

सेतुमाधवराव पगडी थोड्या दिवसांपूर्वी वारले. त्यांना आदरांजली म्हणून त्यांच्या एखाद्या ग्रंथाचा परिचय करून द्यावा असा विचार होता. पगडींची ग्रंथसंपदा मोठी. निवडीचाप्रश्न पडला. तो गेल्या निवडणूक निकालांनी सोडवला. आन्ध्र आणि कर्नाटकात काँग्रेसचा पार धुव्वा उडाला. विरोधकांच्या विजयामागे मुस्लिम मतांचा झुकाव किती महत्त्वाचा होता हे प्रणय रॉय आणि मित्रांनी केलेल्या विश्लेषणात टक्केवारीनिशी दाखवून दिले. भारतीय मुसलमान हा …

दिवाळीतील ओळखी

टिळकांनी लिहिलेः ग्रंथ हे आमचे गुरू होत, आणि पुढे बजावले, छापण्याची कला आल्यापासून ग्रंथनिर्मितीला सुमार राहिलेला नाही. त्यामुळे निवड करून चांगले तेवढेच वाचा. आयुष्य थोडे आहे. महाराष्ट्रात मासिकांची – नियतकालिकांची दिवाळी येते तेव्हा तर हा उपदेश फारच आठवतो. आणखी एक, फडक्यांनी (ना. सी.) एका सुंदर गुजगोष्टीत हितोपदेश केला, तो मार्मिक आहे. आयुष्य कसे घालवावे, आपले …

दिवाळीतल्या गाठी भेटी

दिवाळीची आकर्षणे अनेक असतात. वयपरत्वे ती बदलतात. एक आकर्षण मात्र बहुतांश कायम आहे. दिवाळी अंकांचे. मात्र त्यातही आतला एक बदल आहेच. पूर्वी वेगळं साहित्य खुणावायचं, आता वेगळं. पूर्वी वेगळी अन् अनेक मासिकं घ्यावी वाटायची, आतात्यातली काही अस्ताला गेली; काही नाममात्र आहेत. काहींचा डौल मात्र तोच कायम आहे. वयपरत्वे अंगाने थोडी झटकली इतकेच. मौज, महाराष्ट्र टाइम्स, …

प्रा. रेग्यांची अतीतवादी मीमांसा

सातार्‍याच्या विचारवेध संमेलनात प्रा. रेग्यांनी केलेल्या अध्यक्षीय भाषणातील काही भागाचा हा सारांश. रेग्यांच्या अतीतवादी धर्म आणि नीतीमीमांसेचा प्रतिवाद याच अंकात प्रा. दि. य. देशपांड्यांनी केला आहे. तो वाचताना शीघ्र संदर्भ म्हणून हा आढावा उपयोगी पडावा. विसाव्या शतकातील धर्मचिंतनाकडे वळण्यापूर्वी रेग्यांनी त्याची प्रदीर्घ तत्त्वज्ञानात्मक पार्श्वभूमी कथन केली आहे. तिचा आलेख येथे आहे. पण व्याख्यानाच्या उत्तरार्धातील भारतीय-हिंदू …

सातार्‍याचे विचारवेध संमेलन

साताऱ्याला जायची फार दिवसांची इच्छा होती. परवा अचानक योग आला. ‘विचार करू शकणाच्या माणसांची मतं बनविण्याची प्रक्रिया निर्दोष व्हावी, यासाठी सातार्‍याला चार मित्रांनी एक धडपड सुरू केली आहे. समाजपरिवर्तनाचे काम ‘यद्यपि शुद्धं लोकविरुद्धम्‍’ या कोटीचे असते. या मित्रांनी त्या कामासाठी एक मंडळ स्थापन केले. त्याला ’डॉ. बाबासाहेब आंबेडकर अकादमी’ असे नाव दिले. विसाव्या शतकातील वैचारिक …

गोमंतकातील रसोत्सव

गर्दीचा निकष लावला तर गेल्या महिन्यात गोव्याला झाले तसे साहित्य संमेलन आधी कधी झाले नाही. या गर्दीचे मानकरी तिघे. साहित्य, सृष्टिसौंदर्य आणि शेवाळकर. वहाड आणि मराठवाड्यातले जुने प्रियजन कितीतरी वर्षांनी तिथे भेटले. शेवाळकरांचे अध्यक्षपद आपल्याच माणसाचा बहुमान समजून आलेले. खुद्द गोंयकराची तर सत्त्वपरीक्षेची वेळ होती. कोंकणी ही तिथली बोलभाषा, ती राजभाषा झाली आणि मराठीला मात्र …

प्रोफेसर रेगे –एक उत्तमपुरुष

प्रोफेसर रेगे हे एक कूट आहे. त्याला अनेक उपांगे आहेत. त्यातली काही उकलतात. काहींच्या उत्तरासाठी त्यांनाच बोलते करावे लागेल. एक सोपे कोडे असे की प्रो. रेगे यांची योग्यता आणि त्यांना मिळालेली मान्यता यांत एवढी तफावत का? तत्त्वज्ञान हा रेग्यांचा प्रांत. त्यात आज अग्रपूजेचा मान त्यांचा. महाराष्ट्रातच नाही तर अखिल भारतात. तो त्यांना लाभलेला अजून दिसत …

अकुतोभय गीता साने -२

विनोबांची पदयात्रा होऊन गेल्यानंतर सुमारे सहा महिन्यांनी म्हणजे नोव्हेंबर ६१ मध्ये गीताबाई चंबळ-घाटीत गेल्या. जिथे जिथे विनोबा गेले तिथे तिथे बाई गेल्या. सोबत अर्थात् विनोबांनी स्थापन केलेल्या शांतिसमितीच्या कार्यकर्त्यांची होती. घाटीतील जनता अशा प्रकारच्या चौकश्यांना सरावली होती. ठरीव साच्याची पढविल्याप्रमाणे उत्तरे येत. म्हणून गीताबाईंनी आपला मोर्चा अस्पृश्य आणि स्त्रिया यांच्याकडे वळवला. कारण आचार्यांच्या पदयात्रेवेळी खरा …

अकुतोथय गीता साने – १

वाशीमला भटगल्ली संपते तिथे थोडीशी मोकळी जागा आहे. हा टिळक चौक. त्या चौकात आजूबाजूच्या जुनेर घरांच्या मानाने एक नवी नेटकी इमारत ताठ उभी होती. तिला साने वकिलांचा वाडा म्हणत. पण आम्ही पाहिला तेव्हा तिथे रामभाऊची खाणावळ असे. मधू कायन्देबरोबर मी तिथेअधेमधे गेलो आहे. या वास्तूत थोड्याच वर्षामागे अग्नीसारखी तेजस्वी माणसे वसतीला असत याची आम्हाला तेव्हा …

नागपूरपासून दूर – मागे, मागे

सध्याची पंचायत समिती, ‘राष्ट्रीय विस्तार योजना’ या दुर्बोध नावाने जन्माला आली. चारपाच वर्षांत तिचेच ‘सामूहिक विकास योजना’ असे नामांतर झाले. आणि तिला सध्याचे नामरूप येऊनही आता तीस वर्षे उलटली आहेत. या विकास योजनेत मी उमेदीची सहासात वर्षे घालवलेली. मधूनच जुने सोबती भेटतात. कुणी मोठ्या पदापर्यंत पोचलेले असतात. असेच एकदा जोशी भेटले. मी उत्सुकतेने विचारले, ‘खेड्यांचे …

पुस्तक-परिचय

मृत्यूनंतर लेखक: शिवराम कारंत. अनुवादक: केशव महागावकर, नॅशनल बुक ट्रस्ट ऑफ इंडिया. चौथी आवृत्ती, मूल्य ११.५० मृत्यूनंतर काय, ही महाजिज्ञासा आहे, नचिकेत्याची होती. माझीही आहे. तुमचीही असावी. मी तिच्यापोटी थोडेबहुत तत्त्वज्ञान पढलो. पण तत्त्वज्ञान हे बरेचसे पांडित्यपूर्ण अज्ञान आहे अशीच माझी समजूत झाली. निदान या असल्या महाप्रश्नांपुरती तरी. शाळकरी वयात वाटे-आपण संस्कृत शिकू, वेद-उपनिपदे वाचू. …

पडद्यातला देश

गावी शेजारच्या देवकरण भटजींना ज्योतिष चांगले समजत असे. एकदा माझा हात पाहून ते म्हणाले, ‘याला विद्या नाही. हे भविष्य ऐकून माझी माय कष्टी झाली. पण ते भविष्य तिच्या अंदाजाबाहेर मी खोटे ठरविले. दुसरे, शेंदुर्णीकरांचे भविष्य : ‘तुम्हाला वाहनयोग (चारचाकी) आहे.’ तेही मी आतापर्यंत तरी खोटे ठरवले आहे. परदेशप्रवास घडेल असे मात्र माझ्या हातावर कोणालाच दिसले …

मुळासकट उखडलेल्या- (रक्त पहाट)

सत्तेचाळीस साली स्वातंत्र्याबरोबर फाळणी आली. दोन्हीकडचे अल्पसंख्यक, विशेषतः पंजाबात बळी गेले. संपत्तीइतकीच-किंवा जास्तच-स्त्रियांची लूट झाली. सुजल, सुफल पंजाब “आँधी गम की यूँ चली, बाग उजड़ के रह गया” असा झाला. ‘मारो-काटो’चे वादळ थोडे शमले तेव्हा घरादारांना मुकलेल्या स्त्रियांची आठवण नेते मंडळींना झाली. त्यांचा शोध घेण्यासाठी उभय देशांनी करार केले. पाकिस्तानात लाहोरला आणि भारतात जालंधर येथे मुख्य छावण्या …

पुस्तक परिचय: अमेरिका: अवचटांना दिसलेली

अमेरिका ले. अनिल अवचट मॅजेस्टिक प्रकाशन, ऑगस्ट ९२ मूल्य ६५ रु. कॉलेजात शिकत असताना मनाला अमेरिकेची ओढ वाटायची. खरं तर मुळात इंग्लंड, इटाली, ग्रीस हे कुतूहलाचे विपय असत. ‘नेपल्स पाहावे मग मरावे’ असे भूगोलाच्या पुस्तकात पढलो होतो. ‘Rome was not built in a day अशा म्हणी, सीझर, सिसेरो, अँटनी-क्लिओपाट्रा यांचे इतिहास या साऱ्यांमुळे इटाली, व्हेनिस, …

आगरकर-चरित्राच्या निमित्ताने

राष्ट्रीय चरित्रमालेसाठी गोपाळ गणेश आगरकर यांचे एक संक्षिप्त चरित्र प्रख्यात विचारवंत, लेखक आणि समाजविज्ञान-कोशकार श्री स. मा. गर्गे यांनी लिहिले आहे. आजचा सुधारक गेली दोन अडीच वर्षे आगरकरांनी पुरस्कारलेल्या विवेकवादाचा प्रसार आपल्या मगदुराप्रमाणे करीत आहे. तेव्हा त्याने या अल्पचरित्राची ओळख आपल्या वाचकांना करून द्यावी म्हणून श्री गर्गे यांनी ते आमच्याकडे धाडले. त्या चरित्राच्या निमित्ताने आगरकरांना …

विवेकवादाच्या एका व्यासपीठाची ओळख

गोष्ट पासष्टीची, ले. शांता किर्लोस्कर, वितरक – मौज प्रकाशन गृह, गिरगांव, मुंबई -४, किंमत रु. १५०/ किर्लोस्कर खबर १९२० च्या जानेवारीत निघाले तेव्हा ते अक्षरशः चारपानी चोपडे होते. त्याच्या ३०० प्रती काढल्या आणि ‘आप्तमित्र, ग्राहकबंधूंना वाटल्या. जगप्रसिद्ध फोर्ड या मोटार कारखान्याचे फोर्ड टाइम्स हे मासिकपत्र पाहून शंकररावांना स्फूर्ती झाली आणि ही खबर निघाली. पुढे हे …

लोकहिताचे विवेकी भाष्यकार : लोकहितवादी

उणीपुरी दोन वर्षे आपण महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आठवणी उत्सवाने काढीत आहोत. आपला समाज ज्यावेळी गलितगात्र, स्तंभित आणि संवेदनाहीन होऊन पडला होता त्यावेळी त्यांनी आपल्या आयुष्याच्या कशा मशाली पेटवल्या आणि त्याला चेतवले याचे संस्मरण करणे आपले कर्तव्यच आहे. याच भावनेने आपण आणखीही एका पणतीची आठवण ठेवली पाहिजे. ही आठवण करणे हे जेवढे …

कालचे सुधारक- आधुनिक कामशास्त्राचे प्रणेते : रघुनाथ धोंडो कर्वे (भाग २)

खटल्यात सरकारतर्फे साक्षीदार म्हणून आहिताग्नी राजवाडे उभे राहिले. इतिहासाचार्य राजवाडे यांनी ‘ धिमाधवविलासचंपू’ मध्ये पूर्वी अविवाहित स्त्रियांना मुले होत असे विधान केले खरे, परंतु ते त्यांचे एक तऱ्हेवाईक मत आहे अशी मखलाशी आहिताग्नींनी केली. कर्व्यांच्या बाजूने रियासतकार सरदेसायांची साक्ष झाली. आक्षिप्त लेख शास्त्रीय दृष्टीने लिहिला आहे असा निर्वाळा त्यांनी दिला. न्यायालयाने मात्र तो मानला नाही. …

कालचे सुधारक: नव्या मनूचे वात्स्यायन : रघुनाथ धोंडो कर्वे (भाग १)

कर्व्यांचे प्रेरणास्थान आगरकर होते. ‘इष्ट असेल ते बोलणार आणि साध्य असेल ते करणार’ हा आगरकरी बाणा. तो कर्व्यांच्या अंगी इतका भिनला होता की त्यांचे जीवन ही एकझपाटलेल्या सुधारकाची जीवनकहाणी वाटावी. आगरकर १८९५ साली वारले. कर्वे १८९७ साली संपूर्ण मुंबई इलाख्यात मॅट्रिकला पहिले आले, कॉलेजात सतत गणितात पहिले येत गेले. फ्रान्समध्ये जाऊन त्यांनी गणिताचा आणखी विशेष …

कालचे सुधारक : ताराबाई मोडक (उत्तरार्ध)

पंडिता रमाबाई आणि ताराबाई यांच्यात पुष्कळच साम्य आहेः दोघींनीही शिक्षण क्षेत्रात मूलगामी कार्य केले. खाजगी जीवनात पति-सुखाची तोंडओळख होते न होते तोच त्याने कायम पाठ फिरवली. एकुलती कन्या तरुण असतानाच मरण पावली. दोघींनीही प्रतिकूल सामाजिक परिस्थितीत आपले काम उभे केले, इ.इ. पण एका बाबतीत यांच्यात फरक आहे.आणि तो फार मोठा आहे. पंडिता धर्मनिष्ठ होत्या. त्या …

कालचे सुधारकः ताराबाई मोडक (पूर्वार्ध)

१९ एप्रिल १९९२ रोजी, ताराबाई मोडकांची जन्मशताब्दी झाली. ताराबाई थोर शिक्षणतज्ज्ञ, विशेषतः पूर्व प्राथमिक शिक्षणाबद्दलचे त्यांचे कार्य फार मोठे आहे. पण लक्षात आले की, ताराबाईंचे कार्यच काय, नावही असावे तितके प्रसिद्ध नाही. लोकांचे अशा गोष्टींकडे लक्षच कमी आहे का? असेल. महाराष्ट्राचे सामाजिक सुधारणेसाठी थोडेबहुत नाव आहे. हे कौतुक ऐकायला बरे वाटते. पण त्याच्या मागे शेदीडशे …

वामन मल्हारांची सत्यमीमांसा

वा.म. जोशी हे मानवी जीवनाचे एक थोर भाष्यकार म्हणून ओळखले जातात. त्यांना महाराष्ट्राचे सॉक्रेटीस’ म्हणण्याचा प्रघात आहे. सॉक्रेटीसप्रमाणेच जीवनाचा अर्थ, त्याचे प्रयोजन आणि साफल्य शोधणे या गोष्टींभोवती त्यांचे तत्त्वचिंतन घोटाळत राहाते. सॉक्रेटिसाच्या संवादांचे भाषांतर ही त्यांची पहिली वाङ्यकृती असावी ही गोष्ट पुरेशी सूचक आहे. जीवनाचे मार्गदर्शक तत्त्वज्ञान म्हणून त्यांनी ‘सत्य, सौजन्य आणि सौंदर्य’ या त्रयीचा …

सॉक्रेटीसीय संवाद (उत्तरार्ध)

यूथिफ्रॉन अनुवादक – प्र. ब. कुळकर्णी (सॉक्रेटिसाची एक प्रसिद्ध वादपद्धती आहे. ती ‘सॉक्रेटिसीय व्याजोक्ती (‘Socratic Irony’) या नावाने प्रसिद्ध आहे. या व्याजोक्तीचे उत्तम उदाहरण म्हणून या संवादाकडे बोट दाखविता येईल. साक्रेटिसाच्या संवादांचे एक उद्दिष्ट कोणत्यातरी संकल्पनेचे स्वरूप स्पष्ट करणे हे असले तरी त्यांचे दुसरे ही एक उद्दिष्ट असते, आणि ते म्हणजे जे ज्ञानी असल्याचा टेंभा …

सॉक्रेटीसीय संवाद (पूर्वार्ध)

प्रास्ताविक अनुवादक : प्र. ब. कुळकर्णी पुढे दिलेला संवाद प्लेटोच्या प्रसिद्ध संवादांपैकी एक आहे. प्लेटोच्या बहुतेक संवादांत प्रमुख पात्र त्याच्या गुरूचे सॉक्रेटिसाचे आहे. सॉक्रेटिसाने स्वतः काही लिहिलेले दिसत नाही. परंतु सबंध आयुष्य त्याने तत्कालीन तत्त्वज्ञ आणि सामान्य माणसे यांच्याशी चर्चा करण्यात व्यतीत केले, आणि या चर्चेतून तत्त्वज्ञानाच्या इतिहासाला एक वेगळे वळण लावले. त्याच्या वादपद्धतीचा एक …

खरा सुधारक कोण? प्रा. य. दि. फडके ह्यांच्या भाषणाचा सारांश

सुधारक कोणाला म्हणावे हा एक मूलभूत मुद्दा आहे. शंभर वर्षापूर्वीच्या ज्या अनेक प्रश्नांना आजही उत्तर दिले गेलेले नाही त्यापैकी हा एक प्रश्न आहे. १८९३ साली प्रार्थनासमाजात दिलेल्या एका व्याख्यानात न्या.मू. रानड्यांनी “सुधारक कोण?” असा प्रश्न उपस्थित केला होता. लोकांना राजकारणात भाग घेण्याची हौस असते. अशा वाचाळवीरांची सामाजिक सुधारणेच्या वेळी मात्र दातखीळ बसते. राजकारणाच्या वेळी आणलेला …

प्रा. (श्रीमती) मनू गंगाधर नातू – विवेकवादाची साधना 

३ एप्रिल ९० रोजी श्रीमती मनुताईंच्या मृत्यूला दोन वर्षे होतील. त्यांच्या वाट्याला जे सुमारे ६९ वर्षांचे आयुष्य आले ती एक विवेकवादाची प्रदीर्घ आणि खडतर साधना होती. खडतर अशासाठी म्हणावयाचे की, त्यांच्या जागी दुसरी एखादी स्त्री असती तर तिने विवेकवाद म्हणा किंवा बुद्धिप्रामाण्यवाद म्हणा या विचारसरणीची कास कधीच सोडली असती. एखाद्या चिकट आजारामुळे किंवा अपत्यसुखासारख्या सामान्य …